१५ लाखांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक

 


काळाचौकी पोलिसांची मोठी कारवाई 

मुंबई (प्रतिनिधी): मुंबई पोलिसांनी काळाचौकी येथे मोठी कारवाई करत सुमारे १५ लाख ४० हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केले आहे.  गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.  

 पोलिसांना १० ऑगस्ट २०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका रूममध्ये दोन व्यक्ती अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहेत.  या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक पथक तयार केले आणि नमूद ठिकाणी छापा टाकला.  

 छापा टाकला असता, समीर भाई हिंमत भाई बाल्लार (वय ४२) आणि मोहम्मद शकील अहमद यार मोहम्मद खान (वय २७) हे दोघे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.  त्यांच्याकडून ७७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची अंदाजे किंमत १५ लाख ४० हजार रुपये आहे.  

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर काळाचौकी पोलीस ठाण्यात गु..नं.  २७०/२०२५ अंतर्गत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  यामध्ये सहायक  निरीक्षक अमित भोसले, हसन मुलाणी,  उपनि धनंजय व्यवहारे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.  


 Crime, Mumbai, Police, Drug Bust, Meow Meow, Mephedrone, NDPS Act, Arrest

#MumbaiPolice #DrugBust #CrimeNews #Mephedrone #KalachowkiPolice #NDPSAct #Mumbai #Arrest #MDDrugs



१५ लाखांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक १५ लाखांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक Reviewed by ANN news network on ८/१२/२०२५ ०९:१६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".