तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची प्रचंड गर्दी
कुशावर्त तीर्थावर पवित्र स्नानासाठी भाविकांची रीघ
नाशिक: श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी लाखो भाविकांनी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी गर्दी केली होती. काल मध्यरात्रीपासूनच भाविकांनी मोठ्या उत्साहात ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणेनंतर दुपारी पारंपरिक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा काढण्यात आला. तसेच, कुशावर्त तीर्थावरही पवित्र स्नानासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे दर सोमवार आणि अमावस्येच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या परंपरेनुसार, तिसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून हजारो भाविकांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रदक्षिणेनंतर भाविकांनी भगवान त्र्यंबक राजाच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिक नागरिक आणि परगावांहून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष व्यवस्था केली होती. नाशिक जिल्ह्यातील विविध बस स्थानकांतून त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवासासाठी एसटी महामंडळाने तब्बल २७० जादा बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे भाविकांना वाहतुकीची कोणतीही अडचण झाली नाही.
Pilgrimage, Trimbakeshwar, Shravan, Nashik, Festival
#Trimbakeshwar #Shravan #BrahmaGiriPradakshina #Nashik #Mahadev #Pilgrimage #PalkhiSohla
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: