वाहन दरीत कोसळून ८ महिला भाविकांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना सरकार आणि पंतप्रधानांकडून मदत जाहीर
२९ जण जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर हेडिंग; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले उपचाराचे निर्देश
पुणे: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात पोईट गावाजवळ आज कुंडेश्वराच्या दर्शनाला चाललेल्या महिला भाविकांचे वाहन दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ८ महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, २९ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना तात्काळ चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Accident, Road Accident, Pune, Khad, Fatal Accident
#Pune #RoadAccident #Khed #Tragedy #FatalAccident #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: