विद्यार्थ्यांना उद्योगजगताभिमुख प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन
रोजगाराच्या संधींसाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक – प्रा. प्रशांत वाडकर
पिंपरी, (प्रतिनिधी): यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) मध्ये संगणक तंत्रज्ञानातील जगप्रसिद्ध आयबीएम कंपनीच्या वतीने डेटा सायन्स अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम संस्थेतील बीसीए, बीबीए आणि एमसीए विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) आधारित डेटा सायन्सचे विविध आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यात देण्यात येणार आहे.
यावेळी आयबीएमचे प्रशिक्षक साहिल टोंगळे यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. प्रशांत वाडकर यांनी, नोकरीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी युवा पिढीने अशा इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
एमसीए विभागप्रमुख प्रा. डॉ. अश्विनी ब्रह्मे यांनी हा उद्योगजगताभिमुख अभ्यासक्रम असून विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले.
IIMS
IBM
Data Science
Education
Pimpri Chinchwad
#IIMS #IBM #DataScience #Education #Pimpri #TechnologyCourse #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: