ट्रस्टच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरण्याचा मान
९०० हून अधिक सभासदांच्या मतांनी निवड; नवी कार्यकारिणी जाहीर
युवा नेतृत्वावर विश्वास, समाजासाठी मोठी उपलब्धी
पुणे, (प्रतिनिधी): श्री अग्रसेन ट्रस्ट, चिंचवड प्राधिकरणच्या अध्यक्षपदी विकास टी. गर्ग यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ट्रस्टच्या इतिहासात प्रथमच एखाद्या युवा सदस्याची अध्यक्षपदी निवड झाली असून, विकास गर्ग हे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. त्यांची ही निवड समाजासाठी एक मोठी कामगिरी मानली जात आहे.
१८ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली, तर गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीतील मतदान निकालानुसार ही घोषणा करण्यात आली. ९०० हून अधिक सभासदांनी त्यांना अध्यक्षपदासाठी पसंती दिली. नवीन कार्यकारिणी ३१ मार्च २०२८ पर्यंत कार्यभार सांभाळणार आहे.
या नवीन कार्यकारिणीत अशोक आर. अग्रवाल, प्रवीण एन. अग्रवाल, आशीष प्रेम गर्ग, रमेश कश्मीरीलाल अग्रवाल, मोहन गर्ग, जगमोहन अग्रवाल, राजेश मामनचंद अग्रवाल, धर्मेंद्र अग्रवाल, महावीर मनोहरलाल बंसल, दिनेश रामगोपाल अग्रवाल, विनोद बालकिशन मित्तल, नरेश हुकुमचंद गुप्ता, पवन अग्रवाल आणि लाजपत मित्तल यांचा समावेश आहे.
Vikas Garg
Shri Agrasen Trust
Chinchwad
President Election
Pune
#VikasGarg #ShriAgrasenTrust #Chinchwad #Pune #Leadership #Community

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: