पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोट्यवधी रुपयांची लूट?; उद्या माजी नगरसेवक काळुराम पवार पत्रकार परिषद घेणार
एकाच विकासकामाचे बिल अनेकदा दिल्याचा आरोप; माहिती अधिकारातून गैरव्यवहार उघड झाल्याचा दावा
प्रशासकीय राजवटीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप; प्रशासनावर होणार हल्लाबोल
हॉटेल कलासागर येथे उद्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद
पिंपरी, (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय राजवटीत कोट्यवधी रुपयांची लूट झाल्याचा आरोप माजी नगरसेवक काळुराम पवार यांनी केला आहे. माहिती अधिकार कायद्यातून एकाच विकासकामाचे बिल अनेकदा वेगवेगळ्या ठेकेदारांना देऊन कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी ते उद्या, २० ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेणार आहेत.
हॉटेल कलासागर (पहिला मजला, सितार हॉल) येथे बुधवारी दुपारी ३ वाजता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काळुराम पवार हे या प्रकरणातील सर्व तपशील माध्यमांसमोर मांडणार आहेत.
Pimpri-Chinchwad
Kalu Ram Pawar
Corruption Allegation
Press Conference
PCMC
#PCMC #PimpriChinchwad #Corruption #KaluramPawar #PressConference #RTI

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: