पिंपरी, ४ ऑगस्ट २०२५: आकुर्डी गावातील ज्येष्ठ नागरिक सुशीला चिंतामण जगताप (वय ८४) यांचे रविवारी (दि. ३) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे आणि पणतू असा मोठा परिवार आहे.
रमेश आणि सुभाष जगताप यांच्या मातोश्री
सुशीला जगताप या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी रमेश जगताप आणि सुभाष जगताप यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवावर निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांचा पुण्यानुमोदन दिन गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) सकाळी ११ वाजता विश्वरत्न बुद्ध विहार, आकुर्डी गाव येथे होणार आहे.
Sushila Jagtap, Obituary, Pimpri Chinchwad, Akurdi, Ramesh Jagtap, Subhash Jagtap, Condolence.
#Obituary #Pimpri #Akurdi #SushilaJagtap #PCMC #Condolence #Funeral

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: