'आमदार आपल्या दारी' उपक्रमात ७५३ तक्रारींचे तात्काळ निराकरण
नवी सांगवी, (प्रतिनिधी): महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांवर प्रभावीपणे देखरेख ठेवून सातत्याने पाठपुरावा करावा. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास शहरातील प्रश्न सोडवणे सुलभ होईल, असे मत आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. नवी सांगवी येथे आयोजित 'आमदार आपल्या दारी' या उपक्रमादरम्यान ते बोलत होते.
आमदार जगताप म्हणाले की, "महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्य, वाहतूक, ड्रेनेज यांसारख्या समस्यांची गांभीर्याने दखल घ्यावी आणि त्यावर वेळोवेळी पाठपुरावा करत ठोस उपाय शोधावेत." ते पुढे म्हणाले की, "वाहतूक पोलिसांनी नागरिकांना लहान चुका दाखवून शिस्त लावल्यास भविष्यातील अपघात किंवा अडथळे टाळता येतील."
'आमदार आपल्या दारी' या उपक्रमादरम्यान नागरिकांनी आरोग्य, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक, शासकीय दाखले, रेशन कार्ड, वीजपुरवठा यांसारख्या विविध विभागांशी संबंधित एकूण ७५३ तक्रारी मांडल्या. या तक्रारींचे स्थानिक प्रशासन आणि विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ निराकरण करण्यात आले, ही या उपक्रमाची विशेष बाब ठरली.
या कार्यक्रमाला माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, तसेच महापालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MLA Shankar Jagtap
Aaplya Dari Initiative
Navi Sangvi
Citizen Grievances
Pimpri Chinchwad Administration
#MLAShankarJagtap #AaplyaDari #NaviSangvi #PimpriChinchwad #CitizenGrievances #LocalGovernance #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: