ब्राह्मण महासंघाच्या व्याख्यानातून पेशव्यांच्या इतिहासाला उजाळा
बाजीराव पेशवा यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कार सुरू करण्याची भूमिका
‘पेशवा का नकोत?’ विषयावरील व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
कर्तृत्व महत्त्वाचे, जात नाही; सुशील कुलकर्णी यांचा स्पष्ट पवित्रा
पुणे: पुणे विमानतळाला 'पेशवा बाजीराव' यांचे नाव द्यावे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. 'पेशवा का नकोत?' या विषयावरील व्याख्यानात वक्त्यांनी ही मागणी केली. या कार्यक्रमात बाजीराव पेशवा यांच्या नावाने राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार सुरू करण्याची भूमिकाही मांडण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित या व्याख्यानाला इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला.
ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात व्याख्याते सुशील कुलकर्णी यांनी अठराव्या शतकातील हिंदवी स्वराज्याच्या विस्तारातील पेशव्यांच्या ऐतिहासिक योगदानाचा सखोल आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, बाजीराव पेशवा यांचे कर्तृत्व हे त्यांच्या जातीमुळे दुर्लक्षित केले जाऊ नये, तर त्यांच्या पराक्रमाचा उल्लेख महत्त्वाचा आहे. पानिपतच्या लढाईनंतर मराठी राज्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही, असे ते म्हणाले. त्यांनी केवळ लढाया जिंकल्या नाहीत, तर धर्मासाठी आणि धर्मस्थळांसाठीही मोठे काम केले. केवळ मस्तानीमुळे पेशव्यांचा उल्लेख करणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी, "आपल्या संघटित प्रयत्नातून दाता आणि शूर पिढी निर्माण केली पाहिजे. पेशवे, सावरकर, फडके यांचा इतिहास केवळ विशिष्ट जातीमुळे दुर्लक्षित केला जाऊ नये," अशी भूमिका मांडली.
या कार्यक्रमात सचिन बोधनी, अभय ओरपे आणि गिरीश गुर्जर यांच्या नेतृत्वात १०० कार्यकर्त्यांनी ब्राह्मण महासंघात प्रवेश केला. त्यांना यावेळी पदांची जबाबदारी देण्यात आली. तसेच, नितीन शुक्ल यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
Politics, Pune, Peshwas, Airport Naming, History
#Pune #PeshwaBajirao #AirportNaming #BrahmanMahasangh #History #Politics

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: