'पत्रा चाळ' घोटाळ्याचा आरोप असलेले राऊत भ्रष्टाचारावर बोलतात हे हास्यस्पद; भाजप नेते नवनाथ बन यांची टीका
मुंबई, (प्रतिनिधी): शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी 'अंगडिया'चा नवा धंदा सुरू केला आहे का, असा थेट सवाल भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी केला आहे. दिल्लीत १० हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याची माहिती राऊत यांना कशी कळली, यावरून त्यांनी राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे सातत्याने वायफळ आरोप करतात, पण न्यायव्यवस्थेत कुठेही तक्रार दाखल करत नाहीत. भ्रष्टाचाराबद्दल बोलणारे राऊत स्वतः पत्रा चाळ घोटाळ्याचे आरोपी असून जामिनावर बाहेर आहेत, हे हास्यास्पद आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राऊत यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना बन म्हणाले की, महाराष्ट्राने 'पंगू मुख्यमंत्री' कोण होते हे पाहिले आहे. 'वाझे काय लादेन आहे का?' असे म्हणणारे आणि १०० कोटींची वसुली सुरू असताना बघ्याची भूमिका घेणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच पंगू होते. राऊत हे राहुल गांधींचे 'झिलकरी' बनले असून, राहुल गांधींची भाषा आणि विचार राऊत यांच्याकडून वारंवार ऐकायला मिळतात, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
Sanjay Raut
Navnath Ban
Maharashtra Politics
BJP
Shiv Sena UBT
#SanjayRaut #NavnathBan #MaharashtraPolitics #BJP #ShivSenaUBT #PMLA

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: