नर्मदा, दि. ५ ऑगस्ट २०२५: नर्मदा नदीवर वसलेल्या सरदार सरोवरात बुडालेली बोट रुग्णवाहिका जवळपास आठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. आरोग्य प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या बोट रुग्णवाहिकेला कोणतीही हानी झालेली नाही, मात्र इंजिनमध्ये पाणी शिरल्यामुळे तिची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे.
ही रुग्णवाहिका सीएसआर निधीतून सरदार सरोवर जलाशयाजवळील सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासी पाड्यांवर आरोग्य सेवा पुरवण्यासाठी देण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी जलाशयाचे पाणी शिरल्यामुळे ती बुडत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत ही बोट बाहेर काढली.
या घटनेमुळे आदिवासी भागातील आरोग्य सेवा तात्पुरती विस्कळीत झाली होती, मात्र आता तांत्रिक तपासणीनंतर ती पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
Sardar Sarovar, Narmada River, Boat Ambulance, Rescue, Health Services, Tribal Areas.
#SardarSarovar #BoatAmbulance #Rescue #NarmadaRiver #HealthServices #Gujarat #TribalHealth
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: