दलाल/मध्यस्थांवर विश्वास ठेवू नका; फसवणुकीची शक्यता - मनपाचे आवाहन
मिळकतकर केवळ अधिकृत मार्गांनीच भरावा - पुणे मनपा
पुणे, (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेने मिळकतधारकांना मिळकतकर कमी करून देण्याचे किंवा थकबाकी माफ करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काही मध्यस्थ, दलाल किंवा अज्ञात व्यक्ती रोख रक्कम घेऊन अशा प्रकारचे खोटे दावे करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनपाने हे जाहीर प्रकटन जारी केले आहे.
मनपाने स्पष्ट केले आहे की, अशा व्यक्तींशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, कारण त्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीस पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असेही मनपाने म्हटले आहे.
नागरिकांनी आपला मिळकतकर केवळ पुणे मनपाच्या अधिकृत वेबसाइट (propertytax.punecorporation.org), नागरी सुविधा केंद्र (CFC), किंवा बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बँक, कॉसमॉस बँक, जनता सहकारी बँक या अधिकृत बँकांमध्ये रोख रक्कम, धनादेश किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरावा आणि त्याची अधिकृत पावती घ्यावी, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे उप आयुक्त अविनाश सकपाळ यांनी केले आहे.
Pune Municipal Corporation
Property Tax
Fraud Alert
PMC
Public Notice
#PMC #Pune #PropertyTax #FraudAlert #PublicNotice #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: