नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा; पुणे मनपाचे आवाहन

 


पुणे महानगरपालिकेची कर्मचारी भरती प्रक्रिया पारदर्शक

कोणत्याही मध्यस्थावर विश्वास ठेवू नका; मनपाकडून भरती प्रक्रियेबाबत जाहीर प्रकटन

सर्व अधिकृत माहिती मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

पुणे, (प्रतिनिधी): पुणे महानगरपालिकेने विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहीर प्रकटन जारी केले असून, ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच (https://www.pmc.gov.in) सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल, असेही या प्रकटनात म्हटले आहे.

मनपाने या जाहीर प्रकटनाद्वारे नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यांपासून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही व्यक्तीला नोकरी देण्याचा किंवा काम लावून देण्याचा अधिकार नाही. पैसे घेऊन किंवा खोटी माहिती देऊन नोकरी मिळवून देण्याचा दावा केल्यास अशा व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास त्याला पुणे महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचारी भरती आणि कराराशी संबंधित सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर आणि दैनिक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा आयुक्त विक्रम राम यांनी केले आहे.



  • Pune Municipal Corporation

  • PMC

  • Recruitment

  • Job Fraud Warning

  • Government Jobs

 #PMC #Pune #Recruitment #JobFraudWarning #Maharashtra #GovernmentJobs

नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा; पुणे मनपाचे आवाहन नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यांपासून सावध रहा; पुणे मनपाचे आवाहन Reviewed by ANN news network on ८/१८/२०२५ ०३:५०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".