थेरगाव परिसरात युवासेनेची भव्य तिरंगा रॅली; विश्वजीत बारणे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० दुचाकींवरून कार्यकर्त्यांचा सहभाग
पिंपरी, (प्रतिनिधी): स्वातंत्र्यदिनानिमित्त युवासेना पिंपरी-चिंचवडच्या वतीने थेरगाव परिसरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला. मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तिरंगा हातात घेऊन रॅलीची सुरुवात झाली.
थेरगाव येथील खासदार श्रीरंग बारणे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झालेली ही दुचाकी रॅली दत्तनगर, थेरगाव गावठाण, तापकीर चौक, काळेवाडी फाटा, १६ नंबर, गुजरनगर, गणेशनगर आणि डांगे चौक या मार्गावरून गेली. रॅलीचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्र युवासेना सचिव विश्वजीत श्रीरंग बारणे यांनी केले. यामध्ये सुमारे ५०० दुचाकीवरून कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी 'वंदे मातरम', 'भारत माता की जय' अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण थेरगाव परिसर दणाणून गेला. हातात तिरंगा, मनात उत्साह आणि ओठांवर जयघोष अशा उत्साहाच्या वातावरणात ही रॅली काढण्यात आली. 'राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची ही तिरंगा बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला नवचैतन्य देऊन गेली,' अशी भावना विश्वजीत बारणे यांनी व्यक्त केली.
Youth Sena
Tiranga Rally
Thergaon
Pimpri
Shrirang Barne
#YouthSena #TirangaRally #Thergaon #ShrirangBarne #IndependenceDay #Pimpri #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: