रत्नागिरी, (प्रतिनिधी): रत्नागिरी शहरातील मिररकरवाडा येथे प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. मयत आणि आरोपी हे मूळचे गोरखपूर, उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
रत्नागिरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळच्या वेळी प्रिन्स निषाद (मयत) यांचा खून झाला. या गुन्ह्यात नीरज निषाद, अनुज चौरसिया आणि रवीकुमार भारती या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासामध्ये असे समोर आले आहे की, मयत प्रिन्स निषाद हा त्याच्या प्रेयसीशी फोनवर बोलत होता. याच गोष्टीवरून झालेल्या वादामधून हा खून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
गुन्ह्यात वापरलेले हत्यार, जे लाकडी वस्तू कापण्यासाठी वापरले जाते (chisel), आरोपींकडे सापडले आहे आणि त्यावर रक्ताचे डागही आहेत. मयत प्रिन्स निषाद आणि आरोपी नीरज निषाद हे मामा-भाचे असून, ते सर्वजण सुतारकाम करण्यासाठी रत्नागिरीत आले होते. यातील रवीकुमार भारती हा अनेक वर्षांपासून रत्नागिरीत राहत असून, इतर तिघे नुकतेच येथे आले होते.
गुन्हा घडल्याचे समजताच रत्नागिरी पोलीस दलाची टीम, तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, संपूर्ण माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
Murder Case
Ratnagiri Crime
Arrest
Love Triangle
#RatnagiriPolice #Murder #CrimeNews #Arrest #LoveAffair #Ratnagiri #PoliceInvestigation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: