नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा; मालमत्तेचे नुकसान नाही
नगर परिषद आणि आपत्कालीन पथके सज्ज; मदतकार्य सुरू
लाऊडस्पीकर आणि सायरनद्वारे नागरिकांना सूचना
राजापूर, (प्रतिनिधी): तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर शहरातील जवाहर चौक, खडपेवाडी, मासळी मार्केट आणि वरची पेठ यांसारख्या सखल भागांमध्ये पाणी आले आहे. त्याचप्रमाणे, समर्थ नगर (भटाळी) आणि कोंडेतड ब्रीज परिसरातही पाणी साचले आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेची सर्व यंत्रणा कार्यरत असून, आपत्कालीन बोटही सज्ज ठेवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तातडीने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सूचना देऊन त्यांचे सामान सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सुदैवाने, आतापर्यंत कोणत्याही मालमत्तेचे किंवा जीवितहानीचे नुकसान झालेले नाही.
नियंत्रण कक्षातून दर १० मिनिटांनी लाऊडस्पीकर आणि सायरनद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे.
Rajapur
Flood Alert
Waterlogging
Monsoon
Maharashtra
#Rajapur #FloodAlert #Monsoon #Maharashtra #Waterlogging #SafetyFirst

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: