दोन अल्पवयीन ताब्यात : दोन सराईतांना अटक; ४ पिस्तुले जप्त

 


पुणे, दि. १८ जुलै - पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत रेकॉर्डवरील दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यातघेतले असून  अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे असा एकूण १ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करत असताना केली. यावेळी पोलीस अंमलदार विनायक मोहिते, राहुल ओलेकर आणि गणेश झगडे यांना खास बातमीदारामार्फत सिंहगड रोड कॉलेजच्या क्रिकेट ग्राऊंड बाजूला, वडगाव, पुणे येथे सार्वजनिक रोडचे कडेला एक इसम संशयीतरीत्या अग्निशस्त्र घेऊन थांबलेला असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुमीत बाळासाहेब चव्हाण (वय २०, रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३५,०००/- रुपये किमतीचे एक पिस्टल मिळून आले. त्यास दिनांक १७ जुलै २०२५ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३३/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये अटक करण्यात आली.

याच गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास करत असताना, दिनांक १८ जुलै २०२५ रोजी पहाटे साडेतीन वाजता रेकॉर्डवरील आणखी एक पाहिजे आरोपी अनिकेत महादेव सोनवणे (वय २६, रा. सिध्दार्थनगर, तुळजापूर, जि. धाराशिव) यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४०,०००/- रुपये किमतीचे एक पिस्टल जप्त करण्यात आले.

याशिवाय, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हे रजि. नं. ३३६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३), ३ (५) मधील रेकॉर्डवरील पाहिजे आरोपी किरण विठ्ठल शिंदे (वय २३, रा. जे.एस.पी.एम. कॅम्पस जवळ, कृष्णकुंज अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक, पुणे) याचा शोध घेऊन त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

या सर्व कारवाईमध्ये दोन विधीसंघर्षित बालकांकडून दोन पिस्टल आणि एक जिवंत काडतुस असा ४६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे, सिंहगड रोड पोलिसांनी एकूण चार पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत करून अवैध शस्त्रसाठ्यावर मोठा प्रहार केला आहे.

ही कामगिरी वरिष्ठ  निरीक्षक  अभिजीत पाटील,  निरीक्षक (गुन्हे)  प्रमोद वाघमारे,  उपनिरीक्षक  संतोष भांडवलकर तसेच तपास पथकातील  अंमलदार विनायक मोहिते, राहुल ओलेकर, गणेश झगडे, संदीप चिंचकर, सागर लाड, सचिन ढेबे, अभिजीत पेठकर, अविनाश कड, अमोल पाटील, बापू साठे, राहुल घाडगे, स्वप्निल मगर, अमित गावडे, सचिन सावंत यांनी केली .

Firearm Seizure, Arms Act, Arrest, Pune Police, Sinhagad Road, Crime

#PuneCrime #FirearmSeizure #IllegalArms #SinhagadRoadPolice #PoliceAction #PuneNews

दोन अल्पवयीन ताब्यात : दोन सराईतांना अटक; ४ पिस्तुले जप्त दोन अल्पवयीन ताब्यात : दोन सराईतांना अटक; ४ पिस्तुले जप्त Reviewed by ANN news network on ७/१८/२०२५ ०२:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".