या शिबिरात इनव्हीजन आय हॉस्पिटल अँड लेसर सेंटरच्या नेत्र तज्ज्ञांनी सहभाग घेतला. प्रमुख नेत्रतज्ज्ञ डॉ. अमीषा ठाकूर, सहाय्यक जानवी पोपेटा आणि रिहॅब सय्यद यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक सल्ला दिला. काही विद्यार्थ्यांना चष्म्यांची गरज असल्याचे यावेळी निदान झाले.
या नेत्र तपासणी शिबिरातून एकूण ११० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या आयोजनात माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रितम टकले आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तृप्ती म्हात्रे यांनी मोलाचे सहकार्य केले.
पी. टी. भोये (अध्यक्ष, आरोग्य केंद्र समिती) यांच्या पुढाकाराने, तसेच प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर (वीर वाजेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, फुंडे) यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक वर्गाने या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे आभार मानले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहते आणि नेत्र आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते, त्यामुळे भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: