केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वर्षपूर्ती कार्य अहवालाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रकाशन
पुणे, दि. १३ जुलै २०२५: भारतीय जनता पक्षात (भाजप) कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु राहते आणि त्यातूनच मुरलीधर मोहोळ यांच्यासारखे नेते तयार होतात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या केंद्रीय मंत्रिपदाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आज पुण्यात त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "मुरलीधर मोहोळ यांनी कोविड काळात पुण्याचे महापौर म्हणून अत्यंत उत्तम काम केले. त्यांच्या या कामाची दखल घेऊनच पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली."
या कार्यक्रमाला उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
'भाजपमध्ये कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया सातत्याने सुरु राहते' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Reviewed by ANN news network
on
७/१३/२०२५ ०८:३२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: