कोंढरीपाडा-कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर ३५ वर्षांनंतर प्रकाशाचे लोकार्पण; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद

 


उरण, दि. १२ जुलै २०२५: उरण तालुक्यातील कोंढरीपाडा ट्रान्सफॉर्मर डीपी ते कासवलेपाडा सार्वजनिक शौचालय या मुख्य रस्त्यावर गेली ३५ वर्षे अंधार होता. अखेर या रस्त्यावर पथदिव्यांची सोय झाल्याने स्थानिकांनी आनंदोत्सव साजरा केला. ग्रामस्थांच्या मागणीनंतर, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला म्हात्रे आणि शिवसेना चाणजे विभागप्रमुख अक्षय म्हात्रे यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेत पाठपुरावा केला.

या कामासाठी मावळचे खासदार श्रीरंग  बारणे आणि शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांचे विशेष सहकार्य लाभले. सिडकोच्या निधीतून १० जी.आय. पाईप लाईट पोल बसवून हे काम पूर्ण करण्यात आले असून, नुकतेच या रस्त्यावरील पथदिव्यांचे लोकार्पण शिवसेना तालुका प्रमुख दिपक ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना ठाकूर यांनी या कामाचे कौतुक केले आणि भविष्यात या गावासाठी चांगला निधी देऊन पक्षातर्फे अधिकाधिक कामे केली जातील, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी विधानसभा संपर्कप्रमुख रमेश म्हात्रे, माजी सभापती व तालुका संघटक चंद्रकांत पाटील, उपतालुका प्रमुख प्रशांत पाटील, चाणजे उपविभाग प्रमुख महेश पाटील, बांधकाम कामगार संघटना उपतालुका प्रमुख महेंद्र घरत, प्रभारी शहरप्रमुख सुनील भोईर, युवासेना पूर्व उपविभाग प्रमुख भारत पाटील, ग्रामपंचायत सदस्या प्रमिला म्हात्रेमहेश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक रवींद्र म्हात्रे, राजेश कोळी तसेच अनेक महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेचे प्रतिनिधी अक्षय म्हात्रे यांनी याप्रसंगी सांगितले की, हे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून, नागरिकांच्या मागणीनुसार आणि वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण करण्यात आले आहे. पुढील काळातही गावाच्या आणि जनतेच्या हितासाठी अशीच कामे सुरू ठेवण्याचा आमचा निर्धार आहे. त्यांनी या कामासाठी ठराव मंजूर करून देणारे सरपंच अजय म्हात्रे, स्थानिक सदस्या प्रमिला म्हात्रे आणि ग्रामस्थांचेही आभार मानले. यानंतर ग्रामस्थांनीही या कामाचे कौतुक करून, भविष्यात अशीच विकासकामे शिवसेनेच्या माध्यमातून घडवून आणावीत, असे शुभाशीर्वाद दिले.

कोंढरीपाडा-कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर ३५ वर्षांनंतर प्रकाशाचे लोकार्पण; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद कोंढरीपाडा-कासवलेपाडा मुख्य रस्त्यावर ३५ वर्षांनंतर प्रकाशाचे लोकार्पण; स्थानिकांनी व्यक्त केला आनंद Reviewed by ANN news network on ७/१३/२०२५ ०८:२२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".