पुणे - पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने मुंबई-बंगळूरु हायवेजवळ, सिंहगड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये परराज्यातील मुलींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या एका महिला एजंटला अटक केली आहे. सपना राजाराम कदम (वय ३६) असे अटक केलेल्या एजंटचे नाव असून, तिच्यासोबत इतर तीन साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एका परराज्यातील महिलेची सुटका करण्यात आली आहे.
दिनांक ०७ जुलै २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त घालत असताना, निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना सपना कदम नावाच्या एका महिला एजंटबद्दल माहिती मिळाली. ही एजंट मुलींचे फोटो पाठवून देहविक्रीसाठी रक्कम ठरवत असे आणि ग्राहकांना ठरविलेल्या ठिकाणी मुली पाठवत असे. ती वेश्यागमनासाठी आलेल्या ग्राहकांकडून ४ हजार रुपये मुलींमार्फत किंवा तिच्या साथीदारांकडून स्वीकारत होती. सिंहगड रोड भागातील एका हॉटेलमध्ये ती ग्राहकांच्या मागणीनुसार मुली पुरवून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एका परराज्यातील महिलेची सुटका केली. तसेच, देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या एजंट सपना राजाराम कदम (रा. खडकी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) आणि तिच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ३४१/२०२५, अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक १ येथील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी पार पाडली.
Prostitution Ring, Human Trafficking, Anti-Narcotic Cell, Pune City, Arrest, Rescue Operation
#PunePolice #ProstitutionRacket #HumanTrafficking #CrimeNews #Arrested #AntiNarcoticCell

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: