पुण्यात दोन सशस्त्र सराईत गुन्हेगार जेरबंद, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची मोठी कारवाई

 


पुणे - पुणे शहर गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ ने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील तसेच शरीराविरुद्धच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या दोन आरोपींना लोखंडी हत्यारासह अटक केली आहे. यश दीपक घोडके (वय १९) आणि देवेश विष्णू काळे (वय २०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

दिनांक ०२ जुलै २०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे/फरार/तडीपार आणि आर्म ॲक्टच्या केसेसच्या अनुषंगाने गस्त घालत होते. गस्तीदरम्यान पोलीस अंमलदार अमित गद्रे आणि दत्तात्रय पवार यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आणि सध्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात जामिनावर असलेला आरोपी यश दीपक घोडके याच्याकडे लोखंडी कोयत्यासारखे हत्यार आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कात्रज येथील जैन मंदिर परिसराजवळून यश दीपक घोडके याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ लोखंडी कोयता आढळला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ४ सह २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३०(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासादरम्यान, यश घोडके याने त्याचा साथीदार देवेश विष्णू काळे याच्याबद्दल माहिती दिली. हे दोघेही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, गु.र.नं. २६४/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १९७(२), १९४(२), ३४९(२), ३५२ व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ आणि आर्म ॲक्ट कलम ८(२४) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ या गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी असल्याने, देवेश काळे यालाही ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपींना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर (अतिरिक्त कार्यभार गुन्हे) श्री. विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 Anti Dacoity Squad, Anti Vehicle Theft Squad, Pune City Police, Arrest, Wanted Accused, Illegal Weapon 

 #PunePolice #CrimeNews #Arrest #IllegalWeapons #AntiCrime

पुण्यात दोन सशस्त्र सराईत गुन्हेगार जेरबंद, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची मोठी कारवाई पुण्यात दोन  सशस्त्र सराईत गुन्हेगार जेरबंद, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची मोठी कारवाई Reviewed by ANN news network on ७/०८/२०२५ ०७:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".