सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची आमदार अमित गोरखे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट
पिंपरी चिंचवडमध्ये वैद्यकीय कक्ष लवकरच सुरू होणार
पुणे, पिंपरी चिंचवड, २४ जुलै २०२५: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी पुणे दौऱ्यावर आले असता, त्यांनी आमदार श्री. अमित गोरखे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा आणि शासनाच्या पातळीवर सुरू करता येणाऱ्या उपाययोजनांवर विशेष चर्चा झाली.
शहरातील आरोग्य सुविधांवर चर्चा आणि मार्गदर्शन
मंत्री आबिटकर यांनी शहरातील प्राथमिक व विशेष आरोग्यसेवा अधिक प्रभावी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजनांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी आमदार अमित गोरखे यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांना माहिती दिली की, लवकरच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व मदत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासनामार्फत करेल, असे आश्वासन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
परस्पर सहकार्य आणि जनहिताचे कार्य
ही सदिच्छा भेट परस्पर सहकार्य, विकासदृष्टी आणि जनहिताच्या कार्यासाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरली. या उपक्रमामुळे गरजूंना वैद्यकीय सहाय्यासाठी अधिक सुलभपणे मदत मिळू शकेल, असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.
उपस्थित मान्यवर आणि सत्कार
या भेटीप्रसंगी अनेक मान्यवर डॉक्टर आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये: डॉ. प्रताप सोमवंशी (अध्यक्ष, NIMA पिंपरी चिंचवड, तसेच अध्यक्ष, भाजपा डॉक्टर्स सेल, पिंपरी चिंचवड), डॉ. रमेश केदार, डॉ. सत्यजीत पाटील, डॉ. वैभव लाडे, डॉ. प्रशांत बंब, डॉ. साहेबराव सांगवीकर, डॉ. पिंजारी सर यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे शिल्प, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
Pimpri Chinchwad, Prakash Abitkar, Amit Gorkhe, Health Minister, Public Health, Medical Facility, Citizen Welfare, Pune, Maharashtra, Political Visit
#PimpriChinchwad #HealthMinister #PrakashAbitkar #AmitGorkhe #PublicHealth #MedicalCell #Pune #Maharashtra #Healthcare

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: