वाकड, पुनावळे, ताथवडे परिसरातील समस्या आठ दिवसांत सोडवा; खासदार बारणे यांचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश
पिंपरी, १५ जुलै २०२५: पिंपरी-चिंचवड शहरातील वेगाने विकसित होत असलेल्या वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या आठ दिवसांत मार्गी लावण्याचे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. या भागामध्ये बांधकाम परवानग्या दिल्या जात असल्या तरी, त्या प्रमाणात सुविधा पुरवल्या जात नाहीत, अशी तक्रार नागरिकांकडून होत होती.
नागरिकांच्या तक्रारींवरून खासदार बारणे ॲक्शन मोडवर
वाकड, पुनावळे आणि
ताथवडे भागातील रस्ते,
वीज, पाणीपुरवठा आणि
स्वच्छतेच्या तक्रारी सातत्याने येत असल्याने, खासदार
बारणे यांनी मंगळवारी 'ड'
प्रभाग कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांसोबत एक
बैठक घेतली. या
बैठकीला क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित, कार्यकारी अभियंता सुनील
शिंदे, कार्यकारी अभियंता (विद्युत) सचिन
नांगरे, मुख्य आरोग्य
अधिकारी योगेश फस्ते, सहायक
आरोग्य अधिकारी एस.ए. माने, उपअभियंता (स्थापत्य) रविंद्र सूर्यवंशी आणि
आरोग्य अधिकारी गणेश
देशपांडे उपस्थित होते. याशिवाय, पुनावळे येथील
सेव्हन प्ल्यू मेरिया
ड्राईव्ह सोसायटी आणि कल्पतरू एक्वीसीटसह परिसरातील अनेक
सोसायट्यांमधील
नागरिकही या बैठकीला हजर
होते.
नागरिकांना योग्य सुविधा देण्याचे कर्तव्य महापालिकेचे
खासदार बारणे
म्हणाले की, वाकड, पुनावळे आणि
ताथवडे हा परिसर
वेगाने विकसित होत
असून येथे गगनचुंबी इमारती
आणि मोठ्या सोसायट्या उभारल्या जात
आहेत. महापालिका बांधकाम परवानग्या देण्याचा सपाटा
लावत आहे, परंतु
त्या प्रमाणात सोयी-सुविधा दिल्या जात
नाहीत. नियमित आणि
पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करणे,
रस्त्यांच्या कामाला गती देणे,
कचरा उचलण्याची व्यवस्था करणे,
रस्त्यांची नियमित साफसफाई करणे
आणि वीजपुरवठा जोडणी
करणे ही महापालिकेची कर्तव्ये आहेत,
असे त्यांनी स्पष्ट
केले.
आठ दिवसांत ठोस पाऊले उचलण्याचा अल्टिमेटम
खासदार बारणे
यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की,
कचरा टाकण्यासाठी योग्य
व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर कचरा टाकला जातो.
रस्त्यांवरील राडारोडा तातडीने उचलून
रस्त्यांची साफसफाई नियमित करावी. सेव्हन प्ल्यू मेरिया
ड्राईव्ह सोसायटीच्या भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्यावर उपाययोजना कराव्यात. तसेच, ज्या ठिकाणी
विजेचे खांब उभारले
आहेत पण वीजजोडणी नाही,
त्याठिकाणी महावितरणशी संपर्क साधून वीजपुरवठा सुरू
करण्याचे प्रयत्न करावेत. त्यांनी सर्व
समस्यांवर आठ दिवसांत ठोस
पाऊले उचलून त्या
मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
Pimpri Chinchwad, Srirang Barne, Civic Issues, Wakad, Punawale, Tathawade, PMC, Infrastructure
#PimpriChinchwad #SrirangBarne #CivicIssues #Wakad #PMC #Infrastructure #PimpriNews #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: