पुणे, १५ जुलै २०२५: पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये ७ ते १२ जुलै २०२५ या पाच दिवसांत १५ चितळांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चितळांमध्ये आजारपणाची कोणतीही पूर्वलक्षणे दिसून आली नव्हती, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तपासणीसाठी नमुने पाठवले; तज्ञांचे मार्गदर्शन सुरू
७ जुलै
२०२५ पर्यंत प्राणीसंग्रहालयात ३९
नर आणि ६०
मादी असे एकूण
९९ चितळ होते.
७ ते
१२ जुलै या
काळात १५ चितळांचा मृत्यू
झाला आहे. मृत चितळांच्या शरीराचे अवयव
आणि रक्ताचे नमुने
तपासणीसाठी देशातील विविध अग्रगण्य प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले
आहेत. यात बरेली
येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन
संस्था, भुवनेश्वर येथील
फूट अँड माउथ
डिसीज इन्स्टिट्यूट, भोपाळ
येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ
हाय सिक्युरिटी ॲनिमल
डिसीज आणि नागपूर
येथील विभागीय वन्यजीव संशोधन
व प्रशिक्षण केंद्राचा समावेश
आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, प्राणीसंग्रहालय प्रशासन बरेली
येथील शास्त्रज्ञांशी आणि
प्राणीसंग्रहालयाच्या
आरोग्य सल्लागार समितीतील तज्ञांशी सल्लामसलत करून
मार्गदर्शन घेत आहे.
उर्वरित प्राण्यांची काळजी, परिस्थिती नियंत्रणात
प्राणीसंग्रहालयातील उर्वरित चितळांच्या खंदकाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले
आहे. तसेच, प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष
ठेवून आहेत. इतर प्राण्यांच्या आरोग्याला कोणताही धोका
पोहोचू नये यासाठी
आवश्यक जैविक सुरक्षा उपाययोजना (बायो-सिक्युरिटी मेजर्स) करण्यात आल्या
आहेत.
१३ जुलै
२०२५ पासून उर्वरित चितळांच्या आरोग्यात सुधारणा होत
असल्याचे निदर्शनास आले आहे. आज, १५ जुलैपर्यंत एकाही
चितळाचा मृत्यू झाल्याची नोंद
नाही, अशी माहिती
प्राणीसंग्रहालयाच्या
वतीने देण्यात आली
आहे.
Pune News, Rajiv Gandhi Zoo, Chital Death, Animal Health, PMC News, Traffic Advisory, Pune Traffic
#Pune #PuneNews #RajivGandhiZoo #ChitalDeath #AnimalHealth #TrafficAdvisory #PMC #MaharashtraNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: