मीरा-भाईंदर : वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या नयानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अवघ्या पाच तासांत अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश
मांगीलाल जैन (वय ५६,
व्यवसाय चार्टर्ड अकाउंटंट, रा. हॅपी होम
कॉम्प्लेक्स, शांतीपार्क, मिरारोड पूर्व, ता. जि.
ठाणे) यांच्या शांतीनगर सेक्टर
८, मिरारोड पूर्व
येथील कार्यालयात दोन
आरोपींनी संगनमत करून घरफोडी
केली होती. त्यांनी कार्यालयाच्या
मागील खिडकीचे लोखंडी
ग्रिल कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने उचकटून,
स्लाइडिंग खिडकी बाहेरून उघडून
कार्यालयात प्रवेश केला. त्यानंतर लाकडी
टेबलच्या ड्रॉव्हरमधून ३,१६,०००
रुपये रोख रक्कम
चोरून नेली होती.
याबाबत जैन यांनी
दिलेल्या फिर्यादीवरून नयानगर पोलीस ठाण्यात १३
जुलै २०२५ रोजी
सायंकाळी ६:२४ वाजता
गुन्हा रजि. नंबर २३१/२०२५,
कलम ३३१ (४),
३०५, ३ (५)
भारतीय न्याय संहिता
प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला
होता.
गुन्हा घडल्यानंतर तात्काळ तपास
पथकाने घटनास्थळी धाव
घेतली. कौशल्यपूर्ण तपास
करत रिक्षाचालक नईम
खलिल अन्सारी (वय
३९, रा. मरियम
विला बिल्डिंग, रुम
नं. ३०२, तिसरा
माळा, गोविंद नगर,
नयानगर, मीरा रोड
पूर्व, ता. जि.
ठाणे) याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे केलेल्या अधिक
चौकशीत त्याने आपला
साथीदार हसनजमा कमरुजमा अन्सारी (वय
३५, रा. नर्मदा
कॉम्प्लेक्स, बी विंग, रुम
नं. ५०३, साईबाबा नगर,
मीरा रोड पूर्व,
ता. जि. ठाणे)
याच्यासोबत मिळून हा गुन्हा
केल्याचे कबूल केले. त्यानंतर हसनजमा अन्सारीलाही अटक
करण्यात आले.
आरोपींकडून चोरी
केलेल्या रकमेपैकी २,५०,०००
रुपये रोख रक्कम
जप्त करण्यात आली
आहे. तसेच, गुन्हा
करण्यासाठी वापरलेली ऑटो रिक्षा (एमएच-०४-झेडएच-४७३८)
आणि कार्यालयाचे ग्रिल
तोडण्यासाठी वापरलेले पाईप पाना हे
हत्यार देखील हस्तगत
करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील
तपास सुधीर थोरात
करत आहेत.
अटक करण्यात आलेले
दोन्ही आरोपी सराईत
गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे
दाखल आहेत.
सदरची
कामगिरी उप आयुक्त,
परिमंडळ १, मिरारोड, प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्त, नवघर विभाग,
सोहेल शेख,
आणि वरिष्ठ निरीक्षक, नयानगर पोलीस ठाणे,
अमर जगदाळे
यांच्या मार्गदर्शनाखाली,
गुन्हे प्रकटीकरण पथकाने
यशस्वीरित्या पूर्ण केली.
Crime, Thane News, Police Action, Burglary, Mira-Bhayandar
#ThanePolice #MiraBhayandar #BurglaryArrest #CrimeNews
#NayanagarPolice #PoliceAction #MaharashtraPolice #TheftArrest

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: