स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरूपात रंगभूमीवर; ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग

 

पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक नव्या स्वरूपात रंगमंचावर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. ही माहिती प्रतिष्ठानचे सचिव आणि या नाटकाचे निर्माते रवींद्र माधव साठे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

८ जुलैचे औचित्य आणि १०० प्रयोगांचा संकल्प

८ जुलै १९१० रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेलिस येथे ब्रिटिश जहाजातून जगप्रसिद्ध उडी मारली होती. याच ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानने शुभारंभाचा प्रयोग याच दिवशी आयोजित केला आहे. हे नाटक नव्या स्वरूपात व्यावसायिक रंगमंचावर येत असून, देशात जिथे जिथे मराठी समाज आहे, तिथे हे नाटक पोहोचवण्याचा मानस आहे. प्रतिष्ठानने याचे १०० प्रयोग करण्याचा संकल्प केला असल्याचे रवींद्र साठे यांनी यावेळी सांगितले.

स्वर्गीय सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करत आहे. याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहोत. सावरकरांचे विचार, साहित्य आजच्या पिढीपुढे आणणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट्य आहे, असे रवींद्र साठे म्हणाले. हे नाटक कालसुसंगत असल्यामुळेच याचे महाराष्ट्रभर १०० प्रयोग करण्याचा मानस आहे. त्यासाठी तिकीटदर सर्वसामान्यांना परवडतील असे ३००, २०० आणि १०० रुपये ठेवण्यात आले आहेत. हे नाटक नव्या पिढीतील तरुण कलाकार सादर करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

कलाकार आणि तांत्रिक बाजू

नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर हे नाटकाचे सहनिर्माते आहेत. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन केले आहे, तर संगीत कौशल इनामदार यांचे आहे.

यावेळी सहनिर्माते अनंत पणशीकर म्हणाले, "सावरकरांचे भाषासौंदर्य आणि त्यांच्या लेखांतून दर्शवणारी भव्य दृकश्राव्यता मला कायम भुरळ घालते. हे नाटक त्याचे उत्तम उदाहरण आहे. व्यावसायिक गणित मांडताना आम्हाला सावरकर प्रतिष्ठानची खूप मदत झाली."

नाटकाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी सांगितले की, "'अहिंसेचे तत्वज्ञान' आणि 'राष्ट्रहित' यातील द्वंद्व म्हणजे 'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक. अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलेले या नाटकातले विचार आजही अगदी तंतोतंत खरे ठरतात. ते विचार, आदर्श या नाटकातून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे."

नाटकाची वैशिष्ट्ये आणि गाजलेली गाणी

मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि ऋषिकेश जोशी आदी कलाकारांचा या नाटकात समावेश आहे. भव्य आणि आकर्षक सेट्स, देखणी वेशभूषा, कलाकारांचा अभिनय आणि सावरकरांचे तेजस्वी विचार ही 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

१९३१ मध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी हे नाटक पहिल्यांदा रंगमंचावर आणले होते. यातील 'शतजन्म शोधताना', 'मर्मबंधातली ठेव ही', 'सुकतात ही जगी या' अशी गाणी स्वतः दीनानाथांनी आपल्या गायकीने आणि संगीताने अजरामर केली आहेत.


 Swatantryaveer Savarkar, Sangeet Sanyasta Khadga, Play Revival, Savarkar Darshan Pratishthan, Ravindra Madhav Sathe, Hrishikesh Joshi, Kaushal Inamdar, Mumbai Theater, Marathi Play, Historical Drama, July 8th Performance

#Savarkar #SangeetSanyastaKhadga #MarathiTheater #PlayRevival #MumbaiEvents #HrishikeshJoshi #KaushalInamdar #HistoricalPlay #July8th #TheaterPremiere

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरूपात रंगभूमीवर; ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित 'संगीत संन्यस्त खड्ग' नव्या स्वरूपात रंगभूमीवर; ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग Reviewed by ANN news network on ६/२९/२०२५ ११:१५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".