सिंधुदुर्ग: वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे कावळेसाद पॉईंटवर शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी कोल्हापूरचा एक तरुण तब्बल चारशे फूट खोल दरीत कोसळला. राजेंद्र बाळासो सनगर (वय ४५, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे त्यांचे नाव असून, ते कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला आहेत.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सनगर आपल्या मित्रांसह वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर आले होते. दरीतून उलट दिशेने येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे हवेत रुमाल उडवण्याचा आनंद ते घेत होते. यावेळी त्यांचा रुमाल दरीच्या तोंडाशी पडला. तो रुमाल घेण्यासाठी ते गेले असता, ती जागा निसरडी असल्यामुळे त्यांचा पाय घसरला आणि ते थेट दरीत कोसळले.
घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आंबोली रेस्क्यू टीम आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र, दरीत दाट धुके असल्यामुळे मोहीम अर्ध्यावरच थांबवावी लागली.
Amboli, Sindhudurg, Kavalesaad Point, Tourist Accident, Fall into Gorge, Kolhapur Man, Rajendra Sanagar, Rescue Operation Halted, Monsoon Tourism, Western Ghats
#Amboli #Sindhudurg #KavalesaadPoint #Accident #TouristSafety #MonsoonTourism #WesternGhats #RescueOperation #Kolhapur #MaharashtraNews
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: