शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर वित्त विभागाचे गंभीर आक्षेप; सुप्रिया सुळे यांचा स्पष्टतेचा आग्रह (VIDEO)
नागपूर: राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर (Shaktipeeth Expressway Project) वित्त विभागाने गंभीर आक्षेप घेतल्याचे आणि त्या संदर्भात सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या आज (रविवार, २९ जून २०२५) नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
सुळे यांनी यावेळी प्रकल्पासाठी ८.८ टक्के दराने कर्ज घेतले जात असल्याचा उल्लेख केला. यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडेल, अशी शंका त्यांनी बोलून दाखवली. या संदर्भातल्या सर्व शंका आणि त्रुटी सरकारने तातडीने दूर कराव्यात, अशी अपेक्षा सुळे यांनी यावेळी व्यक्त केली.
Supriya Sule, NCP Sharad Pawar Faction, Shaktipeeth Expressway, Maharashtra Government, Finance Department Objections, Project Funding, Loan Interest Rate, Nagpur Press Conference
#SupriyaSule #ShaktipeethExpressway #MaharashtraPolitics #FinanceObjections #NCP #ProjectFunding #Nagpur #InfrastructureProject #StateExchequer #LoanBurden
Reviewed by ANN news network
on
६/२९/२०२५ ११:१६:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: