निगडी: निगडी येथे भरधाव टेम्पोच्या धडकेने एका पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०६/२०२५ रोजी सकाळी ०६:०० वाजण्याच्या सुमारास दुर्गानगर चौकापुढे सिझन बॅक्वेट हॉलसमोर, विरुद्ध बाजूच्या रोडवर, निगडी, पुणे येथे हा अपघात घडला. फिर्यादी प्रविण सुरेश कांबळे (वय २६ वर्षे, रा. संघर्ष हौसिंग सोसायटी, निगडी, पुणे) यांचे मामा महेंद्र गणपती कांबळे (वय ४९ वर्षे) हे सकाळी घरून थरमॅक्स कंपनीमध्ये कामावर पायी जात असताना, समोरून आलेल्या एम.एच.१२. पी.क्यु. ४२९८ या टेम्पोवरील चालक अतुल गौतम भगत (वय २९ वर्षे, धंदा पोर्टर, रा. समर्थ निवास, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे) याने आपला टेम्पो भरधाव वेगात, हयगईने व अविचाराने चालवून त्यांना समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात महेंद्र गणपती कांबळे यांच्या डोक्यास, पाठीस आणि दोन्ही हातापायांना जबर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार कदम पुढील तपास करत आहेत. आरोपी अतुल गौतम भगत याला अटक करण्यात आली आहे.
- ------------------------------------------------------------------------------------------------------ #RoadAccident, #FatalAccident, #Nigdi, #PunePolice, #Arrest
Reviewed by ANN news network
on
६/०५/२०२५ ०५:४६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: