चाकण: चाकण-तळेगाव चौकात सिग्नल लागल्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला भरधाव ट्रकने धडक दिल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०४/०६/२०२५ रोजी सायंकाळी ०५:३० वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव चौक येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला सिग्नल लागल्यामुळे रस्ता ओलांडत असताना, NL01K ८९१२ या ट्रकवरील चालक समीर नवसार शेख (वय ४२ वर्षे, रा. मु. पो. कुणीकोनर, ता. जत, जि. सांगली) याने ट्रक भरधाव वेगात चालवून फिर्यादीच्या उजव्या पायाला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे फिर्यादीच्या उजव्या पायाच्या गुडघ्यापासून ते टाचेपर्यंत सर्व बाजूस जखम होऊन मांस बाहेर निघाले आहे. अपघातानंतर चौकातील लोकांनी जखमी महिलेला आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार रेंगडे पुढील तपास करत आहेत.
- ------------------------------------------------------------------------------------------------------------- #RoadAccident, #Chakan, #Pune, #Injury, #TrafficSafety

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: