चिखलीत मारामारी; लोखंडी रॉड आणि कोयत्याने हल्ला, दोघे जखमी

 


चिखली: चिखली येथे क्षीरसागर बंधूंनी मारामारी करून एका व्यक्तीला लोखंडी रॉडने, तर दुसऱ्याला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०३/०६/२०२५ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास गुरुकुल कॉलनी, अष्टविनायक चौक, चिखली, पुणे येथे ही घटना घडली. फिर्यादी आणि त्यांचे आई-वडील, भाऊ यांना आरोपी ऋषीकेश मच्छिंद्र क्षीरसागर (वय २४ वर्षे, रा. १६ नंबर कुलस्वामिनी निवास, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) आणि गणेश मच्छिंद्र क्षीरसागर (वय २१ वर्षे, रा. सदर) यांनी येऊन 'तुम्ही माझ्या भावाला मारता का? आता आम्ही तुम्हाला दाखवितो' असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी फिर्यादीचा भाऊ समाधान आणि त्यांचा मित्र सचिन गावडे (रा. अष्टविनायक चौक, चिखली, पुणे) यांनी त्यांना शिवीगाळ करू नका असे सांगितले असता, त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर आरोपी ऋषीकेश याने लपवून आणलेल्या लोखंडी रॉडने समाधानच्या पाठीवर, दंडावर आणि छातीवर मारहाण करून जखमी केले. भावाला मारहाण होत असल्याचे पाहून सचिन गावडे मध्यस्थी करण्यासाठी गेला असता, आरोपी गणेश याने लपवून आणलेल्या लोखंडी कोयत्याने त्याच्या कानावर आणि मानेवर मारहाण करून जखमी केले. दोन्ही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर पुढील तपास करत आहेत. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

  • -------------------------------------------------------------------------------------------------------- #ChikhaliCrime, #Assault, #PunePolice, #Arrest
चिखलीत मारामारी; लोखंडी रॉड आणि कोयत्याने हल्ला, दोघे जखमी चिखलीत मारामारी; लोखंडी रॉड आणि कोयत्याने हल्ला, दोघे जखमी Reviewed by ANN news network on ६/०५/२०२५ ०५:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".