मगरपट्टा सिटी घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश; एक्स-रे टेक्निशियन चोरट्याला अटक; ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे, १४ जून २०२५ - पुणे शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांवर कडक कारवाई करत पुणे गुन्हे शाखेने एका मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. २३ दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी एका एक्स-रे टेक्निशियनला अटक करून ४८ तोळे सोन्याचे दागिने, ५०० ग्रॅम चांदी आणि घरफोडीसाठी वापरलेली मोटारसायकलसह एकूण ४३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात १७ मे २०२५ रोजी रात्री ९ ते १८ मे पहाटे १ वाजेदरम्यान झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा (दाखल क्र. २५४/२०२५) समांतर तपास करत असताना पोलिसांना हा मोठा यश मिळाला. आरोपी रोहित विलास अंधारे (वय २५, व्यवसाय एक्स-रे टेक्निशियन, मूळगाव भांडगाव, ता. परांडा, जि. धाराशिव, सध्या रहिवासी थिटे वस्ती, खराडी) याला गोडबोले वस्तीजवळ मांजरी येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणातील निर्णायक पुरावा म्हणजे नंबर प्लेट नसलेली यामाहा R15 मोटारसायकल होती. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता याच मोटारसायकलचा घरफोडीसाठी वापर झाल्याचे स्पष्ट झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूर, बार्शी, धाराशिव, भूम, परंडा या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला आणि सुमारे १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली.
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे आणि पथक २ चे सहायक पोलीस निरीक्षक सी.बी. बेरड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे हा तपास यशस्वी केला. चौकशीत आरोपीने मगरपट्टा सिटीतील एका फ्लॅटमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या विशेष आदेशानुसार घरफोडीच्या वाढत्या घटनांवर कडक कारवाई करण्याच्या मोहिमेचा हा भाग आहे. सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे, सहाआयुक्त गुन्हे १ गणेश इंगळे आणि सहाआयुक्त गुन्हे २ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली.
या यशस्वी कारवाईत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ चे प्रभारी अधिकारी नंदकुमार बिडवई, पथक २ चे वरिष्ठ निरीक्षक संदीपान पवार आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Crime News, Burglary Arrest, Pune Police, Gold Theft, Criminal Investigation, Law Enforcement, Property Recovery, X-ray Technician Arrest
#PuneCrime #BurglaryArrest #PunePolice #CrimeBranch #GoldTheft #PropertyRecovery #CriminalInvestigation #CCTVSurveillance #LawEnforcement #CrimeNews
Reviewed by ANN news network
on
६/१४/२०२५ ०८:१८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: