महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा गुन्हे अन्वेषण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव

पुणे: गुन्हे तपासात उत्कृष्ट प्राविण्य दाखवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसाठीचा केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळा १३ जून २०२५ रोजी पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांच्या हस्ते सन २०२२ पर्यंतच्या ११ पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांना पदके व प्रशस्तीपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले.

केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र राज्यातून सन २०१८ ते २०२२ पर्यंत एकूण ५४ पोलीस अधिकाऱ्यांना सदर पुरस्कार मिळाला आहे. राज्य स्तरावरून पात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या शिफारशी केंद्रीय शासनास पाठवण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत अपर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे), विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना, महाराष्ट्र राज्य), विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम-पूर्व), आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.), गु.अ.वि. पुणे यांचा समावेश आहे. निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या शिफारशी अहवालांची निकषांनुसार पडताळणी होऊन एकूण २२ पोलीस अधिकाऱ्यांचे शिफारशी अहवाल केंद्रीय गृहमंत्रालय येथे पाठवण्यात येतात, त्यापैकी दरवर्षी ११ पोलीस अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

या समारंभाला श्री. सुनील रामानंद (अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे), श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), श्री. विनयकुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), डॉ. राजेंद्र डहाळे (विशेष पोलीस महानिरीक्षक, रा.गु.अ.कें.), डॉ. बसवराज तेली (पोलीस उप महानिरीक्षक, आगुशा), श्री. सौरभ आग्रवाल (पोलीस अधीक्षक, पुणे पथक), श्रीमती पल्लवी बर्गे (पोलीस अधीक्षक, का. व सं.), श्री. पी. आर. पाटील (पोलीस अधीक्षक, आगुशा), श्री. विवेक मुगळीकर (प्राचार्य, पोलीस संशोधन केंद्र, पुणे) यांसह इतर वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, लहान मुलींचे लैंगिक शोषण, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, फसवणूक आणि मानवी आरोग्यास धोका करणारे गुन्हे, पोक्सो अंतर्गत गुन्हे यासारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने आणि आधुनिक तपास पद्धतीचा अवलंब करून उघडकीस आणले आहेत. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • -----------------------------------------------------------------------------------------------------------------Police Awards, Crime Investigation, Maharashtra Police, Home Minister's Medal, Pune, Law Enforcement
  • #PoliceAwards, #CrimeInvestigation, #MaharashtraPolice, #Pune, #HomeMinisterMedal
महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा गुन्हे अन्वेषण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांचा गुन्हे अन्वेषण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव Reviewed by ANN news network on ६/१४/२०२५ ०६:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".