पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेची गुरुवारी (15 मे 2025) आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उद्योगमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते उदय सामंत हे पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत.
बैठक कासारवाडी येथील हॉटेल कलासागरमध्ये दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शिवसेना उपनेते खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, "राज्यभर शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे आणि पिंपरी-चिंचवड शहरातही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध पक्षांतील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी शिवसेना पूर्ण ताकदीने तयारी करत आहे."
-----------------------------------
#Shivsena
#PimpriChinchwad
#UdaySamant
#PoliticalMeeting
#MaharashtraPolitics
Reviewed by ANN news network
on
५/१४/२०२५ ०८:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: