रत्नागिरी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, रत्नागिरी येथे एका अत्यंत कमी वजनाच्या नवजात बालकाला यशस्वीरित्या उपचार करून जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
१५ मार्च २०२५ रोजी लीना सुतार यांनी एका मुलाला जन्म दिला, ज्याचे वजन केवळ ७५० ग्रॅम आणि गर्भधारणा अवधी २७ आठवडे होते. अशा परिस्थितीत बाळाची स्थिती अत्यंत नाजूक होती.
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग तज्ञ डॉ. शयान पावसकर आणि डॉ. आदित्य वडगावकर यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले. बाळाला श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
या प्रयत्नांमुळे बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत गेली. ६० दिवसांच्या उपचारानंतर, १४ मे २०२५ रोजी बाळ सुखरूप घरी परतले. त्यावेळी त्याचे वजन १६९० ग्रॅम होते.
रुग्णालयाने या यशस्वी उपचाराबद्दल आनंद व्यक्त केला असून डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पण भावनेचे कौतुक केले आहे.
----------------------------------------------
#Ratnagiri
#NewbornCare
#MedicalMiracle
#Healthcare
#PrematureBaby

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: