आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी समुपदेशन आणि आर्थिक सहाय्य

 

पुणे - 'विचारवेध असोसिएशन'ने आंतरजातीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केले आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या उपक्रमांची घोषणा करण्यात आली.    

या उपक्रमांमध्ये इच्छुक युवक-युवतींसाठी समुपदेशन, आर्थिक सहाय्यविषयक मार्गदर्शन, जोडप्यांना एकत्र आणण्यासाठी कार्यक्रम, व्याख्याने आणि सुरक्षित निवासासाठी 'सेफ हाऊस' यांचा समावेश आहे. समाजात आंतरजातीय विवाहांबद्दल असलेले गैरसमज दूर करणे आणि विवाह करणाऱ्यांना आधार देणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती 'विचारवेध असोसिएशन'च्या सरिता आव्हाड यांनी दिली.  

या उपक्रमांद्वारे केवळ विवाहासाठी आधार देणेच नाही, तर सामाजिक बदलांना गती देणे अपेक्षित आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अनिकेत साळवे यांच्याशी ८७९६४०५४२९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.   

-----------------------------------------

 #Inter-caste Marriage

#Social Initiative

#Counseling

#Financial Assistance

#Safe House

#Social Change

#Pune

आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी समुपदेशन आणि आर्थिक सहाय्य आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी समुपदेशन आणि आर्थिक सहाय्य Reviewed by ANN news network on ५/१४/२०२५ ०१:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".