पुणे - अलंकार पोलिस ठाण्यात आणखी एक साइबर फ्रॉडचे प्रकरण उघडकीस आले आहे. कोहळूड येथील ३४ वर्षीय महिलेची ३ लाख ९३ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाली आहे.
२६ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी महिलेला ऑनलाइन माध्यमातून मेट्रोमनी वेबसाइटवर रिक्वेस्ट पाठवून लग्नाचे आमिष दाखवण्यात आले. फसवणूकखोरांनी तिचा विश्वास संपादन करून पैसे पाठवण्यास सांगितले.
मोबाइलधारक व बँक खातेधारक वापरकर्त्यांनी तिला मेट्रोमनी वेबसाइटवर रिक्वेस्ट पाठवून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि पैसे पाठवण्यास सांगून तिची ३ लाख ९३ हजार ८०० रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२) आणि आयटी अॅक्ट ६६(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिता रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
-------------------------------------------------------------------
#MatrimonialFraud #OnlineDatingScam #MarriageFraud #CyberCrime #WomenSafety #PunePolice #MetroMatrimony #OnlineScam

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: