पुणे - खडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण वाहन अपघाताचे प्रकरण घडले आहे. या अपघातात उंद्री येथील ३१ वर्षीय दीपक कसबेकर यांचा मृत्यू झाला आहे.
२१ मे २०२५ रोजी रात्री १०:२० वाजता जुना-पुणे मुंबई हायवे पोस्ट ऑफिसच्या समोर रस्त्यावर हा अपघात घडला. फिर्यादी व त्यांचा भाऊ आकाश बाबन कसबेकर (वय २५ वर्षे) पिसोळी उंद्री येथील रहिवासी अशा दोघांची बंद पडलेली चारचाकी गाडी दुसऱ्या गाडीने ओढून घेत असताना अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात इस्मानं त्याच्या ताब्यातील वाहने हे वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवून अज्ञात ठिकाणी फिर्यादीचा भाऊ आकाश कसबेकर यांस पाठीमागून जबर ठोकर मारून गंभीर जखमी केले. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(ब), ३२४(४), १०६ मोव्हा अॅक्ट, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.
---------------------------------------------------------------------------------------------
#VehicleAccident #HighwayAccident #TruckCollision #RoadSafety #MumbaiPuneHighway #TrafficAccident #PunePolice #RoadAccident

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: