पुणे - लोणीकाळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर हिट अँड रन अपघाताचे प्रकरण घडले आहे. या अपघातात ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
२१ मे २०२५ रोजी पहाटे ४:४५ वाजता कुंजीरवाडी ते हवेली जिल्ह्यातील गावाच्या हद्दीत सोलापूर ते पुणे हायवे रोडवर एलआयसी ऑफिसच्या समोर हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय जाधव नावाच्या पोलिस अंमलदाराच्या तक्रारीनुसार अज्ञात इस्मानं त्याच्या ताब्यातील वाहन हे वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने, अविचाराने व भरधाव वेगात चालवून अज्ञात व्यक्तीला जबर ठोकर मारून गंभीर जखमी केले. या जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.
अपघाताच्या ठिकाणी न थांबता अपघाताची खबर न देता पळून गेलेल्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(ब), १०६ मोव्हा अॅक्ट, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.
--------------------------------------------------------------------
#HitAndRun #RoadAccident #TrafficSafety #PuneHighway #VehicularAccident #RoadSafety #PunePolice #TrafficViolation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: