पुणे: राज्यातील २० शहरातून आलेल्या ११८८ कथक नृत्यांगनांनी एकत्र सादर केलेल्या नृत्याची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' आणि 'वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया' मध्ये झाली आहे. एकाच वेळी सर्वाधिक नृत्यांगनांनी कथक नृत्य सादर करण्याचा विश्वविक्रम यातून नोंदवला गेला. पुण्याच्या प्रेरणा फाउंडेशनच्या 'नृत्य चक्र' या नृत्यसमूहाने या विक्रमाची नोंद केली.
ज्योती मनसुखानी यांच्या संकल्पनेतून विविध गटांच्या एकूण ११८८ नृत्यांगनांनी एकत्र येत २० मिनिटांसाठी नृत्य सादरीकरण केले. संयोजन समितीत तेजस्विनी साठे, ज्योती मनसुखानी, अस्मिता ठाकूर, रसिका गुमास्ते आणि डॉ. माधुरी आपटे यांचा समावेश होता. कथक नृत्यांगनांनी एकाच वेळी सादर केलेल्या सर्वाधिक रचनांसाठी ही नोंद झाली. गतवर्षी २५ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र नोंदीचे प्रमाणपत्र १ मे २०२५ रोजी मिळाले. शास्त्रीय कथक नृत्य सादरीकरणाचा हा उपक्रम महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयाच्या मैदानावर झाला होता.
................................................
#Kathak
#WorldRecord
#LimcaBookOfRecords
#PuneDance
#PrernaFoundation
#NrityaChakra
#IndianDance
#MaharashtraCulture
पुण्यात ११८८ कथक नृत्यांगनांचा विश्वविक्रम!
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२५ ०१:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२५ ०१:२४:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: