अकरा वर्षांपूर्वी ‘आइस बकेट चॅलेंज’ने जगभरात धूम माजवली होती. त्यावेळी अमोट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस (Amyotrophic Lateral Sclerosis) या मेंदूशी संबंधित आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा हे चॅलेंज चर्चेत आले आहे. ‘अर्थ’ ब्रँडने याच लोकप्रियतेचा वापर करत महिलांच्या आरोग्याच्या एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आजही समाजात महिलांच्या मासिक पाळीबद्दल उघडपणे बोलण्यास संकोच केला जातो आणि रजोनिवृत्तीबद्दल चर्चा करणे तर फारच दूरची गोष्ट मानली जाते. अनेकांना रजोनिवृत्ती या संकल्पनेची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ‘अर्थ’ ब्रँडने रजोनिवृत्ती काळात महिलांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांविषयी समाजात जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या जनजागृतीसाठी ‘अर्थ’ ब्रँडने समाजमाध्यमांवर एक विशेष व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत तरुण-तरुणी ‘आइस बकेट चॅलेंज’ पूर्ण करताना दिसत आहेत. प्रत्येकजण श्वास रोखून हातातल्या बादलीतील बर्फाचे पाणी डोक्यावर ओतून घेतो. थंड पाण्याने होणारी धडपड आणि हुडहुडी यातून विनोदी वातावरण निर्माण होते. याच दरम्यान स्क्रीनवर एक प्रभावी संदेश झळकतो - “तुमचे आइस बकेट चॅलेंज संपले असेल, तर आपल्या मातांसाठी उष्णता थांबली नाही.” हा विचारप्रवर्तक संदेश महिलांच्या रजोनिवृत्तीच्या लक्षणांकडे लक्ष वेधतो. आजही समाजात या लक्षणांविषयी मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे.
रजोनिवृत्तीचा काळ सुरू होण्यापूर्वी महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. हार्मोनल बदलांमुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर अनेक समस्या येतात. मध्यम वयात घर आणि संसार सांभाळताना महिलांना याचा अधिक त्रास होतो. एमक्युअरने समाजात आवाहन केले आहे की, आपल्या आईची भावनिक घालमेल वेळीच ओळखा. रजोनिवृत्ती काळात त्यांच्या शरीरात अचानक उष्णता निर्माण होणे आणि रात्री घाम येणे यांसारख्या अनेक बदलांचा सामना करताना त्यांची साथ सोडू नका. मातांचा हा भावनिक संघर्ष समजून घ्या आणि महिलांच्या रजोनिवृत्ती काळातील बदलांविषयी सार्वजनिक स्तरावर चर्चा होणे गरजेचे आहे, असे आवाहन एमक्युअरने केले आहे.
एमक्युअरच्या पूर्णवेळ संचालिका नमिता थापर यांनी या उपक्रमाबद्दल बोलताना सांगितले, “रजोनिवृत्तीत होणाऱ्या बदलांचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. महिला आणि आई या दुहेरी भूमिका सांभाळताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने रजोनिवृत्तीबद्दल बोलणे खूप महत्त्वाचे आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे हे एमक्युअरचे उद्दिष्ट आहे आणि ‘अर्थ’ ब्रँड त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील. मला विश्वास आहे की ही जनजागृती मोहीम समाजात सकारात्मक बदल घडवेल.”
एमक्युअर महिलांच्या रजोनिवृत्तीबद्दल कुटुंबीयांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे. या विषयावर सहजपणे चर्चा व्हावी आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, जेणेकरून खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. मातृदिनाच्या निमित्ताने महिलांच्या समस्या जाणून घ्या, त्यांच्याशी संवाद साधा. कठीण काळात मुलांची भक्कम साथ आणि अर्थपूर्ण संवाद हाच प्रत्येक महिलेला जगण्याची नवी प्रेरणा देतो, असा महत्त्वपूर्ण संदेश एमक्युअरने दिला आहे.
महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘अर्थ’ ब्रँड विविध उत्पादने तयार करतो. रजोनिवृत्ती सुरू होण्याच्या काळापासून ते पूर्ण होईपर्यंत महिलांच्या तक्रारींवर उपाय म्हणून अर्थने अनेक उत्पादने बाजारात आणली आहेत. रजोनिवृत्तीच्या सुरुवातीच्या लक्षणांसाठी ‘अर्थ पेरिमेनोपॉज मल्टी-सिम्पटम सपोर्ट’ ही गोळी पूरक आहार म्हणून घेता येते. या काळात महिलांची एकाग्रता कमी झाल्यास ‘अर्थ ब्रेन फॉग एड’ उपयुक्त ठरू शकते. तसेच ‘अर्थ इंटिमेट क्रीम’ आणि हाडांमधील ठिसूळपणा कमी करण्यासाठी ‘अर्थ बोन हेल्थ सपोर्ट’ देखील उपलब्ध आहे. चांगली झोप येण्यासाठी ‘अर्थ स्लीप सपोर्ट गमीज’ आणि शारीरिक थकवा कमी करण्यासाठी ‘अर्थ फॅटिग सपोर्ट’ची मदत घेता येते. महिलांना रजोनिवृत्तीपूर्वी आणि त्यादरम्यान आराम मिळणे महत्त्वाचे आहे आणि ही उत्पादने त्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रभावी ठरतात.
यंदाच्या जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने ‘आइस बकेट चॅलेंज’ स्वीकारणे हे पारंपरिक रूढी-परंपरांमध्ये अडकलेल्या समाजाला संकुचित दृष्टिकोनातून बाहेर काढण्याचे एक आव्हान आहे. सार्वजनिक स्तरावर रजोनिवृत्तीवर उघडपणे चर्चा व्हावी, हाच या उपक्रमाचा महत्त्वाचा संदेश आहे.
....................................
#Emcure
#EarthBrand
#IceBucketChallenge
#MothersDay
#MenopauseAwareness
#WomensHealth
#LetsTalkMenopause
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२५ ०१:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: