पिंपरी, ५ मे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाने मोठा झटका देत आम आदमी पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात खेचले आहे.
'आप'चे माजी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे आणि पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहणारे बेंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, त्यांच्या सोबत 'आप' आणि शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार महेश लांडगे, राहुल कुल, हेमंत रासने, उमा खापरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘आप’मधून भाजपमध्ये दाखल झालेल्यांमध्ये चेतन बेंद्रे, नारायण भोसले, प्रकाश परदेशी, अरुणा सीलम, दत्तात्रय काळजे, जयदीप सूर्यवंशी, कुणाल वाकटे, धनंजय पिसाळ, शुभम यादव, अशुतोष शेलके, वैभव पाटणकर, अक्षय गावंडे, महेंद्र नागवडे, सागर वाघमारे आदींचा समावेश आहे.
शिवसेना (उबाठा) गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये विभागप्रमुख प्रदीप महाजन, देवानंद कापरे, सुनील साबळे, मनीष आढाव, विवेक मामीडवार, जालिंदर झिंजुरके, अनिल देवशेटवार, डॉ. गिरीश गंधेवार, नितीन अंजीकर, उज्वला महाजन, अजय पाटील यांसारख्या प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेशामुळे शहरातील आम आदमी पार्टी आणि शिवसेना (उबाठा) गटाच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसला असून, भाजप शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे बळ वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने घेतलेली ही आक्रमक भूमिका पक्षासाठी फायदेशीर ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची ही नवी फळी भाजपच्या विजयाच्या संधी अधिक भक्कम करू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
.........................................
#BJP
#PimpriChinchwad
#MaharashtraPolitics
#AAPtoBJP
#ShivSenaUBT
#ChetanBendre
#PradeepMahajan
#MunicipalElections
#PoliticalDefection
#ShankarJagtap

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: