१९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांचे 'मिथक चिकित्सा' या विषयावर, मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांचे 'न्यायव्यवस्था ते निवडणूक आयोग : स्वातंत्र्य आणि निष्पक्षतेवरचे आक्रमण' या विषयावर, लोकसंस्कृतीच्या अभ्यासक स्नेहा टोम्पे यांचे 'मातृत्वतत्त्वांची मिथके' या विषयावर आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
'गांधी दर्शन' विषयावरचे हे २० वे शिबिर असून, यामध्ये सत्य, अहिंसा, सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यासारख्या गांधीजींच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांवर सखोल चर्चा होणार आहे. गांधीवादी विचारसरणी आजच्या जगातदेखील कशी उपयुक्त ठरू शकते, यावर प्रकाश टाकला जाईल.
महात्मा गांधींच्या विचारधारेचे सखोल चिंतन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार असून, या विचारांतून एक नवी दृष्टी आणि दिशा मिळेल. समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे शिबिर आयोजित केले गेले आहे.
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी एड. स्वप्नील तोंडे (९९२३५२३२५४), तेजस भालेराव (९१७२४८७०१९), एड. राजेश तोंडे (९८९०१००८२०) यांच्याशी संपर्क साधता येईल.
शिबिरासाठी दोनशे पन्नास रुपये नोंदणी शुल्क आहे. यामध्ये शिबिरस्थळी नाश्ता, चहा आणि भोजनाचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना प्रवेश शुल्क ऐच्छिक आहे.
सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
................................................
#GandhiDarshan
#KothrudEvent
#PuneWorkshop
#GandhianPhilosophy
#SocialAwareness
#NonViolence
#TruthAndJustice
#YouthEducation
#MaharashtraGandhiMemorialFund
#GandhiBhavan
#MayEvents
#GandhianPrinciples
#CompetitiveExamPreparation
Reviewed by ANN news network
on
५/०५/२०२५ ०३:११:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: