सोयगाव: सोयगाव तालुक्यातील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साईवनशा संगणक प्रशिक्षण केंद्र आणि आरंभ कोचिंग क्लासेस, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार, २२ मे रोजी सकाळी ९:०० वाजता कुरुक्षेत्र अकॅडमी, सोयगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे. सोयगाव वकील संघाचे तालुकाध्यक्ष आणि श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन ॲड. राजेश गिरी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. एस. म्हस्के, पॉलिटेक्निक कॉलेज कन्नडचे प्राचार्य संतोष मतसागर, बार्टी समाज कल्याण समन्वयक रवींद्र बारी आणि ग्रामीण रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
साईवनशा कॉम्प्युटरचे संचालक बिराजी गायकवाड, राजेंद्र जावरे आणि आरंभ कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. योगेश सुनील काळे आणि प्रा. प्रणय पी. कुलकर्णी यांनी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
------------------------------------------------------------------------------------------
#CareerGuidance #Soygaon #Education #Students #Maharashtra #Career #Guidance
Reviewed by ANN news network
on
५/२२/२०२५ ०८:२९:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: