विश्रामबाग व सिंहगड रोड परिसरात घटना
पुणे : विश्रामबाग व सिंहगड रोड परिसरात झालेल्या दोन मोठ्या घरफोडी चोऱ्यांमध्ये सुमारे २० लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनांची नोंद विश्रामबाग आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पहिली घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकमान्य नगर जॉगिंग पार्क जवळील पायस सोसायटीमध्ये घडली. फिर्यादी ४७ वर्षीय महिलेच्या आईच्या फ्लॅटमध्ये २० मे रोजी पहाटे २ ते ६ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला आणि ६५,००० रुपये रोख रक्कम आणि १० लाख ३३ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने असा एकूण १०,९८,००० रुपयांचा ऐवज चोरला.
दुसरी घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर येथील आशीष अपार्टमेंटमध्ये घडली. फिर्यादी ४५ वर्षीय इसमाच्या फ्लॅटमधून १७ ते २० मे दरम्यान १,५०,००० रुपये रोख रक्कम आणि ५,८९,२०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ७,३९,२०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला.
या प्रकरणांचा तपास अनुक्रमे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------
#PuneCrime #HouseBreaking #JewelleryTheft #Burglary #SinhagadRoad #Vishrambaug #PunePolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: