फोंडा येथे २५ हजार भाविकांच्या निवास-भोजनाची सोय; सुरक्षेची जय्यत तयारी
फोंडा (गोवा): गोव्याच्या भूमीत १७ ते १९ मे दरम्यान 'सनातन राष्ट्र शंखनाद' नावाचा एक भव्य आध्यात्मिक कुंभमेळा आयोजित करण्यात येत आहे, ज्यामध्ये देशभरातून हजारो भाविक, संत-महंत आणि २३ देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत
या महोत्सवात २५ हजारांहून अधिक भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त हा महोत्सव आयोजित करण्यात येत असून, या महोत्सवाच्या माध्यमातून रामराज्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल टाकले जाणार आहे, असे मत श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले
संपूर्ण गोव्यात महोत्सवासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली असून, जागोजागी भव्य फ्लेक्स, भगवन श्रीकृष्णाचे कटआऊट्स आणि स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत
१ लाख २६ हजार चौरस मीटर क्षेत्रात पसरलेल्या या महोत्सवात भाविकांसाठी वातानुकूलित मंडप, भोजन व्यवस्था, १७ पार्किंग झोन आणि ३५० प्रसाधनगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे
#SanatanRashtra
#HinduFestival
#Goa
#Spirituality
#IndianCulture

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: