पिंप्री-चिंचवड: आळंदी परिसरात गांजा तस्करीच्या प्रकरणी ५८ वर्षीय गंगे माने कामी या नेपाळी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २ लाख १३ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
२१ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता आळंदी पोलिस स्टेशन हद्दीतील मरकळ गावच्या हद्दीत बागवान वस्ती येथील गट क्र ६१२ मधील शेतामध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई योगेश्वर औदुंबर कोलेकर (बॅज नं.१२८१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी गंगे माने कामी (५८ वर्षे) हा मूळचा नेपाळमधील बाविया चौक, खेडा जिल्हा सुखेत देशाचा नागरिक आहे. त्याच्याकडे हिरवट रंगाचे ओलसर उगा वास येत असलेली बांडे येत असलेली गांजा या अमली पदार्थाची सुमारे दोन ते पाच फूट उंचीची छोटी मोठी एकूण १५ झाडे आढळली.
त्यापैकी ४ किलो २६० ग्रॅम वजनाची २ लाख १३ हजार रुपयांची अमली पदार्थाची अनाधिकारपणे, बेकायदेशीर रित्या तो कामास असलेल्या शेतामध्ये गांजाची झाडे लावलेली असताना मिळून आला आहे.
या प्रकरणी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्सेस अॅक्ट १९८५ चे कलम ८(ब), ८(क), २०(ब) अंतर्गत आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप-निरीक्षक खडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
--------------------------------------------------------------
#AlandiPolice #DrugArrest #CannabisSeizure #NepaliCitizen #NDPSAct #PimpriChinchwadPolice

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: