शेतात गांजा लागवड, वृद्धाला अटक
पिंप्री-चिंचवड: महाळुंगे एमआयडीसी परिसरात गांजा तस्करीच्या प्रकरणी ६५ वर्षीय बाळू बाबन गाळव याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून १४ लाख १ हजार २५० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
२० मे रोजी संध्याकाळी ६:१५ वाजता महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील कोरेगाव खुर्दगावच्या हद्दीत गट क्र ३७१ शेतामध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई राजकुमार दमोदर हनमंते (बॅज नं.१९४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी बाळू बाबन गाळव (६५ वर्षे, राहिवासी कोरेगाव खुर्द) याच्याकडे हिरवट रंगाचे ओलसर उगा वास येत असलेली बांडे येत असलेली गांजा या अमली पदार्थाची सुमारे पाच ते दहा फूट उंचीची छोटी मोठी एकूण ४० झाडे आढळली. त्यापैकी २८ किलो वजनाची एकूण १४ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
त्याच्याकडे मिळून आलेला २५ ग्रॅम गांजा १२५० रुपये किंमतीचा मिळाला. अशा प्रकारे एकूण १४ लाख १ हजार २५० रुपयांच्या अमली पदार्थाची अनाधिकारपणे, बेकायदेशीररित्या कब्जातील शेतामध्ये गांजाची झाडे लावलेली असताना आणि स्वतःकडे बाळगला असताना मिळून आला आहे.
या प्रकरणी नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सब्सटन्सेस अॅक्ट १९८५ चे कलम ८(ब), ८(क), २०(ब)(ii)(अ), २०(क) अंतर्गत महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उप-निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
-----------------------------------------------------------------------------------------
#DrugBust #CannabisSeizure #MahalungePolice #NDPSAct #PimpriChinchwadPolice #DrugTrafficking

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: