एकात्मिक मॉडेलिंग आणि सिम्युलेशन तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उद्योगांच्या नवोपक्रमाला देतोय चालना
पुणे : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपनी दासॉ सिस्टिम्सने (युरोनेक्स्ट पॅरिस: FR0014003TT8, DSY.PA) आज पुण्यातील मॅरियट हॉटेलमध्ये "३डी एक्सपिरियन्स मॉडेलिंग अँड सिम्युलेशन (मॉडसिम) कॉन्फरन्स २०२५" चे यशस्वी आयोजन केले. या परिषदेत विविध उद्योगक्षेत्रांतील महत्त्वाचे नेते, अभियंते, डिझाइनर आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांनी एकत्र येऊन मॉडसिम आणि जनरेटिव्ह तंत्रज्ञानाच्या एकत्रित उपयोगातून नवोपक्रम क्षेत्रात होत असलेल्या बदलांवर चर्चा केली.
दिवसभर चाललेल्या या परिषदेत उच्च-प्रभावी चर्चासत्रे, ग्राहकांच्या यशोगाथा, थेट प्रात्यक्षिके आणि तज्ज्ञांच्या पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्व सत्रांमध्ये एकात्मिक मॉडेलिंग आणि सिम्युलेशन (मॉडसिम) दृष्टिकोणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. परिषदेतील प्रमुख विषयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सिम्युलेशन, डिजिटल ट्विन अनुभव, शाश्वत डिझाइन आणि आभासी पडताळणी यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश होता.
परिषदेत प्रमुख उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी जलद, कमी खर्चातील नवोपक्रम आणि शाश्वत विकासासाठी मॉडसिमची महत्त्वपूर्ण भूमिका विशद केली. थेट प्रात्यक्षिकांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करणे (डिकार्बनायझेशन), लवचिक उत्पादन आणि स्मार्ट मोबिलिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्हर्च्युअल ट्विनच्या उपयोगांचे प्रभावी प्रदर्शन करण्यात आले.
परिषदेतील काही उल्लेखनीय सत्रांमध्ये खालील विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली:
- जनरेटिव्ह एक्सपिरियन्स विथ मॉडसिम: रिशेपिंग द फ्युचर ऑफ इनोव्हेशन
- लिव्हरेजिंग युनिफाइड डिझाइन अँड सिम्युलेशन फॉर न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट
- ट्रान्स्फॉर्मिंग मॉडेलिंग अँड सिम्युलेशन युजिंग जनरेटिव्ह एक्सपिरियन्सेस
- मॉडसिम पॉवर्ड डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन अॅट होंडा
- पॉवर ऑफ इंटेग्रेटेड डिझाइन अँड सिम्युलेशन थ्रू मॉडसिम अप्रोच
- मॉडसिम अॅडव्हान्स्ड कॉमन मॉडेल फॉर सिम्युलेशन्स
- लिव्हरेजिंग एमबीएसई टू एम्पॉवर मल्टिडिसिप्लिनरी मॉडसिम फॉर सॉफ्टवेअर-डिफाइन्ड व्हेइकल्स
- मॉडसिम अप्रोच फॉर इलेक्ट्रिकल सिस्टम डिझाइन अँड सिम्युलेशन फॉर ईएमआय/ईएमसी अप्लिकेशन्स
- मॉडसिम पॉवर्ड एआय युजिंग सिम्युलिया सोल्युशन्स
- जनरेटिव्ह डिझाइन विथ कॅटिया सोल्युशन्स
मॉडसिम हे मॉडेलिंग (सीएडी) आणि सिम्युलेशन (सीएई) यांना एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते, ज्यामुळे डिझाइन, विश्लेषण आणि पडताळणी प्रक्रिया अधिक सोपी होते. या एकात्मिक वातावरणात रिअल-टाइम सहयोग, बाजारात उत्पादन लवकर आणणे आणि प्रत्यक्ष प्रोटोटाइप्स व उशिरा होणारे अपयश कमी होतात.
भारतात डिजिटल नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दासॉ सिस्टिम्सच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मॉडसिम सादर करण्यात आले. आज हे विविध उद्योगांमध्ये एंड-टू-एंड उत्पादन विकासाला चालना देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. वार्षिक मॉडसिम इंडिया परिषद ग्राहक यशोगाथा, विविध उद्योगांमधील नवोपक्रम आणि परिवर्तनात्मक उपयोगांची उदाहरणे सादर करण्याचे एक प्रभावी माध्यम ठरली आहे.
मॉडसिम २०२५ ही परिषद एक महत्त्वाचा टप्पा आहे, जी हे दर्शवते की भारतीय कंपन्या एकात्मिक डिझाइन-सिम्युलेशन दृष्टिकोन वापरून ऑटोमोटिव्ह, पायाभूत सुविधा, जीवन विज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये स्पर्धात्मकता कशी वाढवत आहेत, संशोधन आणि विकास (आरएंडडी) कसा वेगवान करत आहेत आणि शाश्वत विकासाला कशा प्रकारे चालना देत आहेत.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
#DassaultSystemes
#MODSIM2025
#3DEXPERIENCE
#DigitalTransformation
#AIinManufacturing
#DigitalTwin
#VirtualSimulation
#SustainableInnovation
#PuneEvent
#IndustryInnovation
#GenerativeDesign
#CATIA
#SIMULIA

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: